महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या डहाणूच्या महालक्ष्मीची यात्रा आज पासून (16 April) सुरू होत आहे. ही यात्रा तब्बल पंधरा दिवस चालते. त्यानिमित्ताने…
ठाणे जिल्ह्यातील आदिवासींची आदिमाता असलेली डहाणूची महालक्ष्मी महाराष्ट्र आणि गुजरातमधील लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे. इथल्या देवळातील पुजारी आदिवासी असून सोवळं न नेसताच देवीची पूजा करतात. बऱ्याच वर्षांपासूनच परंपरा आजही चालू आहे. बखरकार फेरिस्ता यांनी हे दैवत एकेकाळी अतिशय श्रीमंत होतं असं म्हटलं आहे. १००८ मध्ये सुलतान महम्मदाने हल्ला करून देवस्थान लुटलं होतं. त्या वेळी त्याने सात लाख सुवर्ण दिनार , सातशे मणांचे सोन्या-चांदीचे पत्रे , दोनशे मण शुद्ध सोन्याच्या लगडी , दोन हजार मण अशुद्ध चांदीचे पट , वीस मण रत्नं, हिरे, मोती, पाचू, माणिक असा किमती ऐवजी लुटून नेला होता. तर गझनीच्या महम्मदाने हे देऊळ लुटून तिथे मशीद बांधली. मुस्लीम राज्य खालसा झाल्यानंतर , इथे पुन्हा मंदिर बांधलं गेलं. त्या वेळी राजा तोरडमल यांच्यासोबत अकबर बादशहाने देवीचं दर्शन घेतलं होतं. पंजाब प्रांत स्वतंत्र केल्यानंतर राजा रणजितसिंहाने मंदिरावर सोन्याचा कळस चढवला. अशा ऐतिहासिक नोंदी नोंदवण्यात आल्या आहेत. पुराणातच अनेक अख्यायिका आहेत.
कोल्हापूरची महालक्ष्मी गुजरातकडे जात असताना तिला हा परिसर खूपच आवडला. म्हणून देवीने गडाच्या टोकावर मुक्काम केला. पांडव अज्ञातवासात असताना या ठिकाणी त्यांनी मुक्काम केला होता. देवीचं मुख्य मंदिर डहाणूपासून अठरा किलोमीटर आणि मुंबई-अहमदाबाद हायवेवरील चारोटी नाक्यापासून आठ किलोमीटर असलेल्या वधवा गावाजवळील गडावर आहे. मंदिर पायथ्यापासून चारशे फूट उंचावर असून तिथे जाण्यासाठी नऊशे पायऱ्या आहेत. एक हजार फूट उंच शिखरामुळे देवीचा डोंगर सहज दिसतो. या मंदिरात जाण्यासाठी खूप परिश्रम पडत असल्याने डोंगराच्या पायथ्याशीही मंदिर बांधण्यात आलं आहे. हे मंदिर हायवेवर चारोटी नाक्यापासून अवघ्या तीन किलोमीटरवर आहे. इथे नेहमी गदीर् असते. मात्र यात्रेच्या वेळी भाविक वरच्या मंदिरात जातात. पौणिर्मेच्या मध्यरात्री १२ वाजता सातवी कुटुंबातील प्रमुख पुजारी ध्वज , पूजेचं साहित्य , देवीची ओटी भरण्याचं साहित्य घेऊन पायथ्याशी असलेल्या मंदिरातून एकटाच निघतो. ध्वज लावण्याचं ठिकाण पायथ्यापासून १४०० फूट उंच शिखरावर आहे. तिथे पोहोचल्यावर तो तुपाचा दिवा लावून ध्वज फडकवतो. मग यात्रा सुरू होते.
-Sachin Borse